कर वसुली करण्याचे माणगाव ग्रामपंचायतीस आदेश, विद्युत यंत्रणेची कर वसुली करण्यास परवानगी
माणगावकरांच्या एकजूटीचा विजय
कोल्हापूर / प्रतिनिधी:
ग्रामपंचायत हद्दीत असणाया महावितरणचे विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर, उपकेंद्र, हायटेंशन पोल याच्या थकीत कर वसुलीचे आधिकार ग्रामपंचायतीला अधिनियमातील तरतुदीनुसार आहेत. याअधिकाराचा वापर करून माणगाव ग्रामपंचायतीने कर वसुली करावी असे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एफ जे. काथावाला व मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने मंगळवारी दिले असल्याची माहिती सरपंच राजू मगदूम यांनी दिली.
माणगाव ग्रामपंचायतीने दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. यामधे उच्च न्यायालयाने ग्रामपंचायतीस आपला कर वसूल करण्याचा आधिकार आहे .आपण त्या आधिकाराचा वापर करून महावितरणाच्या विद्युत यंत्रणेवरील कर आकारणीची थकबाकी वसूल करावी.
त्यासाठी माणगाव ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत अधिनियम मधील तरतुदी नुसार वसुलीचे प्रोसेडींग चालू करावे.महावितरण ज्या पद्धतीने आपल्या आधिकाराचा वापर करून आपली थकबाकी वसूल करन्यासाठी वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन बंद करते. त्याचपद्धतीने माणगाव ग्रामपंचायतीला ही आपला थकित कर वसूल करण्याचा आधिकार आहे. त्यानुसार वसुलीची कारवाई करावी असे आदेशात नमूद आहे.
20 डिसेंबर 2018 चा शासन निर्णय काय आहे,हे पाहण्यापेक्षा कर वसुलीचा आधिकार ग्रामपंचायतीला आहे .त्या अधिकाराचा वापर ग्रामपंचायतीने करावा . त्यानुसार ग्रामपंचायतीने महावितरणावर वसुलीची कारवाई करीत असेल्याचे पत्र न्यायलयात बुधवारी ( 11 ऑगस्ट) हजर करावे असेही स्पष्ठ केले. या सुनावणीला माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ?ड. धर्यशिल सुतार साहेब , ?ड. संदीप कोरेगावें , सरपंच डॉ. राजू मगदूम , ग्रामविकास अधिकारी बी बी राठोड आणि महावितरण चे अधिकारी व वकील हजर होते.