वार्ताहर / खोची
खोची ता. हातकणंगले येथे ‘माझं कुंटुब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअतंर्गत प्रत्येक नागरिकांच्या आरोग्य सर्व्हे करण्यात येत आहे. सध्याच्या कोरोना परिस्थितीमध्ये आरोग्ययंत्रणा कोरोनायोध्दा म्हणून काम करत आहे. राज्य शासनाच्या या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत प्रशासक व्ही. एम. पाटील,ग्रामविकास अधिकारी आर. एस. मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
यामध्ये आरोग्यसेवक ए.एल. आगाशे, आरोग्यसेविका शुंभागी देसाई, आशासेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी महावीर मगदूम, अरविंद पोवार, लक्ष्मण ढाले, संजय शिंदे ही सर्व यंत्रणा काम करत आहे. प्रत्येक कुंटुबाच्या घरोघरी जावून ताप, सर्दी, खोकला, ऑक्सिजनचे प्रमाण तपासत आहेत. याचबरोबर कोरोनापासून बचाव करण्यासाठी जनजागृती, लोकांना मार्गदर्शन करण्याचेही उत्तम काम ही सर्व आरोग्ययंत्रणा या मोहिमेद्वारे करत आहे. गावातील प्रत्येक नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्व्हे मध्ये योग्य ती माहिती देवून सहकार्य करावे.असे आवाहन ग्रामविकास अधिकारी आर. एस. मगदूम यांनी केले आहे.