गगनबावड्यात तिसर्या दिवशीही कडकडीत बंद
प्रतिनिधी / गगनबावडा
गगनबावडा तालुक्यातील गारीवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडील एका आरोग्य सेविकेचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. कोल्हापूरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या संपर्कात आलेल्या गारीवडे परिसरातील सात आशा वर्कर्स सेविकांना गगनबावडा येथील कोरोना सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत.
गगनबावडा तालुक्यात यापूर्वी पोलीस ठाणे, वनविभाग, महसूल व आता आरोग्य विभाग अशा शासकिय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधित निघाल्याने तालुक्यात चिंता वाढत आहे. प्रशासकिय पातळीवर ज्या त्या विभागाच्यावतीने खबरदारी घेतली जात आहे. गगनबावडा तालुक्यात कोरोनाबाधित सापडलेले हे चौथे शासकीय कर्मचारी आहेत.
दरम्यान, गगनबावडा येथील बाजारपेठ सलग तिसर्या दिवशीही कडकडीत बंद राहिली. गुरुवार येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या घरातील अन्य लोकांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यांचे कोरोना अहवाल येईपर्यंत गगनबावडा येथे सर्व व्यवहार शंभर टक्के बंद ठेवण्यात आले आहेत.