उचगाव /वार्ताहर
गांधीनगर (ता. करवीर) येथे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंदी आदेश असतानाही क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून क्रिकेट मॅच खेळवले बद्दल सहा जणांच्यावर गांधीनगर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ब , साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम 1987 चे कलम 2, 3 महाराष्ट्र कोविड 19 चे उपायोजना कलम 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमित रावलानी, जितू डेंबानी, सनी चंदवाणी, प्रकाश जग्याशी, दीपक आहुजा, शिवम सुंदरानी( सर्व राहणार गांधीनगर) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दिनांक 23 रोजी रात्री सहा ते अकरा वाजता कुटिया मंदिरापाठीमागे सिंधी समाजाच्या मैदानावर क्रिकेट मॅचचे आयोजन करण्यात आले होते. गांधीनगर पोलिसांनी क्रिकेट स्पर्धेचे आयोजनासाठी परवानगी नाकारली होती. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे काढलेल्या बंदी आदेशाचे पालन न करता गांधीनगर पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून मॅच खेळल्याबद्दल गांधीनगरच्या सहा जणांवर महाराष्ट्र कोविड 19 ची उपाय योजना कलम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाजी आनंदा पाटील यांनी गांधीनगर पोलिसात दिली आहे अधिक तपास गांधीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक आकाश पाटील करीत आहेत.