प्रतिनिधी / कोल्हापूर
देशाच्यासह राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना कोल्हापूरकरांसाठी दिलासादायक वृत्त आहे. मार्च महिन्याच्या तिसऱया आठवडय़ात पुण्याहून कोल्हापूरला भक्तीपूजा नगर परिसरातील पाहुण्यांकडे आलेली एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. ही त्यामुळे खळबळ उडाली होती. तीच व्यक्ती आता कोरानामुक्त झाली आहे. या व्यक्तीच्या दुसऱया स्वॉबचा अहवाल (दुसरी चाचणी) निगेटिव्ह आला आहे.
दरम्यान, मकरजहून परतलेला शाहूवाडी तालुक्यातील युवक कोरोना पॉझिटिव्ह ठरला होता. त्याची महिला नातेवाईक देखील कोरोनाने संक्रमित झाल्याचे शनिवारी आलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोनाबाधितांची संख्या सहा झाली असली तरी एका व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने हा अकडा एकने कमी झाला आहे. त्यामुळे सध्या जिल्हय़ातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या पाच इतकी आहे.
शाहूवाडीतील महिला कोरोना पॉझिटिव्ह
शाहूवाडी तालुक्यातील ही महिला मरकजहून जिलहयात आली होती. उचत या गावातील तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील इतर सर्वांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. बाधित तरुणाची महिला नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल शनिवारी जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी.केंम्पीपाटील यांनी दिली.
पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 6 वर
उचत गावातील तरुणाच्या चाचणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांचे स्क्रिनिंग व तपासणी करण्यात आले. तसेच त्यांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज व पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यात संबंधित तरुणाच्या आईची चाचणी पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. शाहूवाडीतील उचत गावातील तरुण व महिला कोरोना पॉ†िझटिव्ह आढळल्याने जिल्हयातील कोरोना पॉ†िझटिव्ह रुग्णांची संख्या आता 6 वर पोहचली आहे. मात्र भक्तीपूजा नगरातील पॉझिटिव्ह रूग्णाच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 6 वरून 5 वर घसरली आहे. दरम्यान, या कोरोना पॉ†िझटिव्ह असलेल्या उचतच्या पॉझिटिव्ह ठरलेल्या महिलेला 9 एप्रिल रोजीच सीपीआरमध्ये दक्षता म्हणून दाखल करण्यात आले होते. सध्या तिला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी.केंम्पीपाटील यांनी दिली आहे.
64 रुग्णांचे स्वॅब नमुने पाठविले एनआयव्हीला
शनिवार 11 मार्च रोजी कोल्हापुरातील सीपीआर व इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील रुग्ण संख्या 127 इतकी आहे. सीपीआरमधील 161 तर आयजीएममधील 12 अशी एकुण 177 कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱया रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी सीपीआरमधील 52 तर आयजीएममधील 12 अश्या एकुण 64 संशयित रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पुणे व मिरज येथील एनआयव्हीला पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.