जिल्हय़ात रूग्ण संख्या १०२९ वर
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात मंगळवारी इचलकरंजी येथील वृद्ध महिला, पुरूषाचा कोरोनाने मृत्यू झाला. दोघेही वृद्ध आहेत. इचलकरंजीतील कोरोना बळींची संख्या ६ तर जिल्हय़ातील कोरोना बळींची संख्या १६ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात ५१ पॉझिटिव्ह रूग्ण आल्याने पॉझिटिव्ह रूग्णांची संख्याही वाढत आहे. पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा १०२९ वर गेला आहे. शहरातील रूईकर कॉलनी, यादवनगर, राजोपाध्येनगर येथील तिघांसह, करवीर, चंदगड, शिरोळ, इचलकरंजी,
आजरा, चंदगड भागातील रूग्णांचा समावेश आहे.
जिल्हय़ात मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यत पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांमध्ये गडहिंग्लज येथील ७५ वर्षीय महिला, इचलकरंजी येथील ४० वर्षीय पुरूष, ७३ वर्षीय वृद्ध, ७५ वर्षीय महिला, चंदगड येथील ३८ वर्षीय महिला, ५२ आणि ६२ वर्षीय पुरूषांचा समावेश आहे.
दरम्यान, सायंकाळी ७ वाजता आलेल्या ८ पॉझिटिव्ह रूग्णांत इचलकरंजीतील ५, हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील १ आणि रत्नागिरी शहरातील एकाचा समावेश आहे. यामध्ये इचलकरंजीतील स्वामी मळा येथील ४२ वर्षीय पुरूष, संत चौकातील ५८ वषींय पुरूष, सुमेरू बिल्डींग येथील ५६ वर्षीय पुरूष, सातपुते गल्ली येथील ३५ वर्षीय महिला, भाग्यरेखा टॉकीज, कामगार चाळ येथील ५६ वर्षींय पुरूष, शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथील पाटील नगरातील ४९ वर्षीय पुरूष, हातकणंगले तालुक्यातील इंगळी येथील ३८ वर्षींय महिला, रत्नागिरी येथील कासारवल्ली, रेहमत मोहल्ला येथील ६७ वर्षांच्या वृद्धाचा समावेश आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
दरम्यान, रात्री ८ वाजता आलेल्या २० पॉझिटिव्ह रूग्णांत चंदगड तालुक्यातील शिनोळी येथील २० वर्षीय तरूण, देवरेवाडी येथील ३४ वर्षींय महिला, तांबीळवाडी येथील ५५ वर्षीय पुरूष, करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव येथील ७२ वर्षीय वृद्ध, ३५ वर्षीय महिला, कणेरी येथील १८ वर्षींय पुरूष, गोकुळ शिरगाव येथील ६५ वर्षीय वृद्धा, ३० वर्षीय महिला, चोपडी येथील 31 वर्षीय महिला, शिरोळ तालुक्यातील कुंरूदवाड येथील ४६ वर्षीय पुरूष, शिरोळ येथील ४९ वर्षीय महिला, ४८ वर्षीय पुरूष, १६ वर्षीय मुलगा,२० वर्षीय तरूण, ३३ वर्षीय महिला, आजरा तालुक्यातील अर्दाळ येथील ६७ वर्षीय वृद्ध, ६४ वर्षीय वृद्धा, गडहिंग्लज तालुक्यातील कौलगे येथील ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्हय़ात आतापर्यत चंदगड तालुक्यातील ६, करवीर तालुक्यातील ६, शिरोळ तालुक्यातील ७, इचलकरंजी येथील ७, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील प्रत्येकी २ आणि हातकणंगले तालुक्यातील एकाचा समावेश आहे. रूग्णांचा आकडा १०२९ वर पोहोचला आहे.
दरम्यान रात्री ९ वाजता आलेल्या ८ पॉझिटिव्ह रूग्णांत शहरातील रूईकर कॉलनी येथील ३० वर्षांचा तरूण, राजोपाध्येनगर येथील ५२ वर्षांचा पुरूष, आणि यादवनगर येथील ८५ वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. करवीर तालुक्यातील शिये शिवाजीनगर येथील २९ वर्षीय तरूण, हातकणंगले तालुक्यातील वालाबापू गल्ली, भेंडोळी येथील ५० वर्षीय पुरूष, इचलकरंजीतील दत्त बालाजी चौकातील ४८ वर्षीय महिला, ७५ वर्षीय वृद्ध, भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथील ७० वर्षीय वृद्धा यांचा समावेश आहे. रात्री १० वाजेपर्यत पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ५१ वर पोहोचली आहे.
दरम्यान, मंगळवारी रात्री १० वाजेपर्यत परजिल्हय़ातून जिल्हय़ात आलेल्या १८७८ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५०९ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. ५५४ जणांना आयसोलेटेड केले आहे. आतापर्यत १०३८ स्वॅबचे रिपोर्ट आले. यामध्ये ३६ पॉझिटिव्ह आणि १ हजार निगेटिव्ह आले आहेत. तिघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्हय़ातील कोरोनामुक्तांची संख्या ७६३ झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १०२९ वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.