प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रूग्ण संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संभाव्य स्थितीचा अंदाज घेत दुसऱया टप्प्यात जिल्हय़ातील नविन 19 ठिकाणी कोविड केअर सेंटरमध्ये (केविड काळजी केंद्र) जादा 2338 खाटांची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या केंद्रांचे कामकाज अधिक प्रभावीपणे होण्यासाठी तीन नोडल अधिकाऱयांची नियुक्त केली आहे. या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
तीननोडलअधिकाऱयांचीनियुक्ती
जिल्हा पातळीवरील कोविड केअर सेंटरच्या कामकाजात प्रभावीपणे समन्वय राहण्यासाठी तीन नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. महानगरपालिका क्षेत्रासाठी आरोग्य आधिकारी डॉ. दिलीप पाटील, नगरपालिका क्षेत्रासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी सी केम्पीपाटील आणि ग्रामीण भागासाठी आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांच्यावर नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक योजना म्हणून दुसऱया टप्प्यातील कोविड केअर सेंटरसाठी पुढील संस्थांची निवड करण्यात आली आहे.
नव्याने स्थापन होणारी कोव्हीड काळजी केंद्रे आणि खाटांची क्षमता
करवीर व कोल्हापूर शहर-
शिवाजी विद्यापीठ हॉस्टेल क्रमांक 1 आणि 2 प्रत्येकी 150 खाट, शिवाजी विद्यापीठ हॉस्टेल क्र 3 – 200 खाट, तंत्रशास्त्र विभाग- 300 खाट, आयसोलेशन रुग्णालय व आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, अंडी उबवणी केंद्र, कृषी महाविद्यालय होस्टेल (पदवी आणि पदव्युत्तर), राजर्षी शाहू पब्लिक स्कूल, कुरुकली प्रत्येकी 100 खाट.
कागल– कोगनोळी टोल नाका कोविड केंद्र- 150 खाट
भुदरगड– संत बाळूमामा मंदिर रुग्णालय- 150 खाट
शिरोळ– डॉ. जे जे मगदूम वैद्यकीय महाविद्यालय, आगर- 60, डॉ. एम सी मोदी होमिओपॅथी रुग्णालय, जयसिंगपूर- 90.
हातकणंगले– संजय घोडावत होस्टेल, अतिग्रे, एच 5, एच 6 आणि एच 7 अनुक्रमे 90, 105 आणि 100 खाट,
पन्हाळा– संजीवन महाविद्यालय- 128, महात्मा गांधी रुग्णालय, वारणा– 150 आणि डॉ. पाटील आयुर्वेदीक रुग्णालय, कोडोली- 75.
शाहूवाडी– प्राथमिक आरोग्य केंद्र शित्तूर- 40
कोरोनाविरूद्धच्या लढय़ात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दुसऱया टप्प्यात नवीन 19 केविड केअर सेंटरची निवड करण्यात आली आहे. या सेंटरचे कामकाज तातडीने सुरु करण्याविषयी सर्व तालुकास्तरीय अधिकाऱयांना सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रातील कामकाजासाठी तांत्रिक मार्गदर्शन व सहाय्य करण्यासाठी नोडल अधिकाऱयांचीही नियुक्त केली आहे.
-दौलत देसाई, जिल्हाधिकारी