प्रतिनिधी / कुरूंदवाड
शेतकरी व सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याची बॅंक म्हणून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची ओळख आहे. शेतकरी वर्गाचे पुर्णतः सर्व व्यवहार हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेतूनच होतात. या बॅंकेत शेतकरी, शेतमजूर, बचतगट यांचे सेव्हिंग खाते असून सदर खातेतुन सन 2015 पासून प्रत्येक वर्षी वर्षातून दोन वेळा सत्तर रूपये ऐंशी पैसे (हाप ईयरली )चार्जेस पोटी कपात केली जात आहे. गोर गरीब जनता ही आपल्या कष्टाच्या उत्पन्नातुन आपले भविष्याचा संसाराचा चरिथार्थ चालावा यासाठी आपली बचत रक्कम जनधन खात्यात ठेवली आहे. माञ बॅंकेच्या या अतिरिक्त कपातीमुळे ग्राहकाचे नुकसान होत असुन एकीकडे बॅंकेत सेव्हिंग ठेव खात्यावर व्याज जमा करण्याऐवजी चार्जेस कट केला जात आहे ही बाब चुकीची आहे.
जनधन योजनेतून कपात केलेली अतितरिक्त चार्जेस ज्या – त्या खातेदारांच्या खातेस जमा करावे यासाठी कुरूंदवाड येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखाधिकारी शिवाजी कारंडे यांना निवेदन देण्यात आले आहे. सदरचे कपात केलेले चार्जेस जमा न केल्यास लोकशाही पद्धतीने आंदोलनं करण्याचा इशाराही या निवेदनात दिला आहे. या निवेदनावर शेतकरी संघटना युवा आघाडी शिरोळ तालूका अध्यक्ष बंडू पाटील (कडोले), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते विश्वास बालीघाटे,बंडू उमडाळे,योगेश जिवाजे,कुमार माणगावे व रमेशकुमार मिठारे यांच्या सह्या आहेत.