प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात सोमवारी गेल्या 24 तासांत 26 नवे रूग्ण दिसून आले. तसेच 35 जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 422 जणांची तपासणी केली आहे. कोरोनाने दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विलास देशमुख यांनी दिली.
जिल्हÎात सोमवारी दुसऱया दिवशीही कोरोना मृत्यू निरंक राहिला, आजपर्यत कोरोनाने 1,687 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 836, नगरपालिका क्षेत्रात 342, शहरात 362 तर अन्य जिल्हÎांतील 147 जणांचा समावेश आहे. सध्या 251 सक्रीय रूग्ण आहेत. दिवसभरात 422 जणांची तपासणी केली. त्यातील 126 जणांची ऍटीजेन टेस्ट केली.
शेंडा पार्क येथील लॅबमधून सोमवारी 717 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 700 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 126 रिपोर्ट आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 89 रिपोर्ट आले, त्यापैकी 76 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 2, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 2, गगनबावडा 0, हातकणंगले 3, कागल 0, करवीर 1, पन्हाळा 1, राधानगरी 1, शाहूवाडी 0, शिरोळ 1, नगरपालिका क्षेत्रात 12, कोल्हापूर शहर 11 आणि अन्य 5 असे 216 रूग्ण आहेत. दिवसभरात 35 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 47 हजार 248 झाली आहे. नव्या 26 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्ण संख्या 49 हजार 186 झाल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.
पॉझिटिव्ह रूग्ण 26, कोरोनामुक्त 35, कोरोना मृत्यू 0
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 49 हजार 186
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 47 हजार 248
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 251
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1 हजार 687
गेल्या 24 तासांत 422 संशयितांची तपासणी