करवीर वगळता अन्य तालुक्यांत कोरोना निरंक
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने बुधवारी सीपीआर हास्पिटलमध्ये तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये मंगळवार पेठेतील 69 वर्षीय पुरूष, पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील 68 वर्षीय पुरूष व इंगळी चिकोडी (बेळगाव) येथील 62 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 33 रूग्ण दिसून आले. तर 18 कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 1 हजार 741 जणांची तपासणी केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात बुधवारी शहरातील 1, जिल्ह्यातील 1 आणि अन्य जिल्ह्यातील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1,741 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागात 851, नगरपालिका क्षेत्रात 349, कोल्हापूर शहरात 383 तर अन्य जिल्ह्यातील 158 आहेत. दिवसभरात 18 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 48 हजार 358 झाली आहे. जिल्ह्यात करवीर वगळता कोणत्याही तालुक्यात नवा रूग्ण दिवसभरात दिसून आलेला नाही.
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 33 नवे रूग्ण मिळून आले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 0, करवीर 2, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 3, कोल्हापूर शहरात 24 तर अन्य 4 जणांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी 1281 जणांची तपासणी केली. त्यातील 161 जणांची अँटीजेन टेस्ट केली आहे. सध्या जिल्ह्यात 187 सक्रीय रूग्ण आहेत.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून बुधवारी 471 रिपोर्ट आले. त्यापैकी 453 निगेटिव्ह आहेत. अँटीजेन टेस्टचे 182 रिपोर्ट आले. त्यापैकी 181 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 370 रिपोर्ट आले. त्यापैकी 341 निगेटिव्ह आहेत. सक्रीय रूग्णांत आणखी 12 जणांची वाढ झाल्याने ही संख्या 187 वर पोहोचल्याचे डॉ. माळी यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजचे रुग्ण –
कोरोना रूग्ण : 33 (एकूण : 50,286)
कोरोनामुक्त : 18 (एकूण : 48,358)
कोरोना मृत्यू : 3 (एकूण मृत्यू : 1741)
सक्रीय रूग्ण 187; 24 तासांत 1281 जणांची तपासणी