कोल्हापूर जिल्हय़ात 24 तासांत 1014 नवे रूग्ण, 24 कोरोना बळी
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात बुधवारी गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 हजार 14 नवे रूग्ण दिसून आले. दहा दिवसांत तिसऱयांदा कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 हजारांवर पोहोचली आहे. 1 सप्टेंबरला 1 हजार 195, शनिवारी, 5 रोजी 1 हजार 96 आणि आता 1 हजार 14 नवे रूग्ण समोर आले. आजपर्यत पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 31 हजार 318 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाने 24 जणांचा मृत्यू झाला तर 686 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
जिल्हय़ात गेल्या 24 तासांत 1 हजार 584 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 862 रूग्णांचे स्वॅब घेण्यात आले तर 609 जणांची ऍटीजेन टेस्ट करण्यात आली. जिल्हय़ात 686 रूग्णांना डिसचार्ज दिल्याने कोरोनामुक्तांची संख्या 20 हजार 11 पर्यत पोहोचली आहे. शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबकडून 2 हजार 740 रिपोर्ट आले. त्यापैकी 2 हजार 235 निगेटिव्ह असून 437 पॉझिटिव्ह आहेत. ऍटीजेन टेस्टचे 609 रिपोर्ट आले. त्यापैकी 453 निगेटीव्ह असून 421 पॉझिटिव्ह आहेत,
जिल्हय़ात गेल्या 24 तांसात कोरोनाने 24 जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे कोरोना बळींची संख्या 958 वर पोहोचली आहे. बुधवारी सीपीआर हॉस्पिटलमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्यांत सरवडे राधानगरी येथील 50 वर्षीय पुरूष, कागल येथील 70 वर्षीय महिला, मोरे मानेनगर कळंबा येथील 73 वर्षीय पुरूष, गारगोटी येथील 72 वर्षीय महिला, कळंबा करवीर येथील 72 वर्षीय पुरूष, पिंपळगाव खुर्द कागल येथील 75 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये स्वामी मळा इचलकरंजी येथील 60 वर्षीय पुरूष, शिरढोण शिरोळ येथील 75 वर्षीय पुरूष, कबनूर येथील 64 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.
शहरातील अन्य हॉस्पिटलमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्यांत कांचनवाडी करवीर येथील 60 वर्षीय पुरूष, जयसिंगपूर शिरोळ येथील 65 वर्षीय पुरूष, अष्टेकरनगर येथील 64 वर्षीय पुरूष, नागाळा पार्क येथील 45 वर्षीय पुरूष, बापूरामनगर, कळंबा येथील 64 वर्षीय पुरूष, नागाव हातकणंगले येथील 78 वर्षीय पुरूष, नागाळा पार्क येथील 60 वर्षीय महिला, बोंद्रेननगर रिंगरोड येथील 63 वर्षीय पुरूष, हिंगणगाव, हातकणंगले येथील 58 वर्षीय पुरूष, इचलकरंजी येथील 63 वर्षीय पुरूष, कलनाकवाडी भुदरगड येथील 52 वर्षीय पुरूष, कराड येथील 42 वर्षीय पुरूष आणि सांगली जिल्हय़ातील बागणी वाळवा येथील 72 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. कोरोना मृत्यूंत ग्रामीण भागात 406, नगर पालिका क्षेत्रात 257, कोल्हापूर शहरात 252 तर अन्य 43 जणांचा समावेश आहे.
जिल्हय़ात गेल्या 24 तासांत कोरोनाने 1014 नवे रूग्ण समोर आले. यामध्ये आजरा 12, भुदरगड 25, चंदगड 10, गडहिंग्लज 13, गगनबावडा 1, हातकणंगले 117, कागल 13, करवीर 132, पन्हाळा 34, राधानगरी 32, शाहूवाडी 29, शिरोळ 42, नगर पालिका क्षेत्रात 115 तर कोल्हापूर शहरात 385 व अन्य 54 जणांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 31 हजार 318 वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. केम्पीपाटील यांनी दिली.