प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत 278 जण पॉझिटिव्ह रूग्ण आढळून झाले. तर,दिवसभरात 48 जण कोराेना मुक्त झाले. शहरात 50 पॉझिटिव्ह रुग्ण झाले. यामुळे एकूण पॉझिटिव्ह संख्या 2505 झाली आहे.
लक्ष्मीपुरी येथील एका खाजगी हॉस्पिटलमधील डॉक्टर सह 7 जण कोराेना बाधित आले. त्यामुळे रात्री उशिरा हे हॉस्पिटल सील करण्यात आले आहे. आज पर्यंत काेराेना मुक्त झालेल्यांची संख्या 1047 झाली आहे. शहरात रात्री उशिरा मार्केट यार्ड येथे दहा आणि लाईन बाजार येथे सहा रुग्ण पॉझिटिव्ह दिसून आले.
तर, आज कोरोनाने सहा जणांचा बळी घेतला. यामध्ये कर्नाटकातील महिला, टोप येथील महिला, शहरातील देवकर पाणंद येथील महिला, इचलकरंजीतील तिघांचा समावेश आहे. या 6 बळींमुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 60 वर पोहोचली आहे.