प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाने सीपीआर हॉस्पिटलमध्ये मुरगुड (ता. कागल) येथील 66 वर्षीय महिला आणि कळंबे तर्फ ठाणे (ता. करवीर) येथील 58 वर्षीय पुरूषाचा कोरोनाने मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 55 नवे रूग्ण दिसून आले तर 65 कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 45 हजार 352 झाली. पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 48 हजार 16 झाली आहे. सध्या 1 हजार 25 रूग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 368 संशयितांची तपासणी केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकत्सक डॉ. अनील गवळी यांनी दिली.
जिल्ह्यात गुरूवारी सीपीआर, केअर सेंटरमध्ये 368 जणांची तपासणी झाली. सध्या 1 हजार 25 रूग्ण उपचार घेत आहेत. शेंडा पार्क येथील लॅबमधून 705 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 657 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 118 रिपोर्ट आले. त्यापैकी 11 निगेटिव्ह आहेत. जिल्ह्यात कापशी रोड मुरगुड येथील 66 वर्षीय महिला, कळंबे तर्फ ठाणे येथील 58 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. कोरोना बळींची संख्या 1 हजार 639 झाली आहे. ग्रामीण भागात 804, नगरपालिका क्षेत्रात 338 महापालिका क्षेत्रात 359, अन्य 138 जणांचा समावेश आहे.
गेल्या 24 तासांत 65 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 45 हजार 352 झाली आहे. चंदगड 1, गडहिंग्लज 1, हातकणंगले 15, करवीर 6, पन्हाळा 4, राधानगरी 2, शाहूवाडी 5, शिरोळ 1, नगरपालिका क्षेत्रात 1, कोल्हापूर शहर 16 आणि अन्य 3 असे 55 रूग्ण असल्याची माहिती डॉ. अनील माळी यांनी दिली.
पॉझिटिव्ह रूग्ण 55, कोरोनामुक्त 65, कोरोना मृत्यू 2
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 48 हजार 016
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 45 हजार 352
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 1 हजार 25
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1 हजार 639
गेल्या 24 तासांत 368 संशयित रूग्णांची तपासणी