कोरोनाने रत्नागिरीतील एकाचा मृत्यू, 51 नवे रूग्ण, 42 जण कोरोनामुक्त
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात सोमवारी रत्नागिरी जिल्हÎातील दाभोळे (ता. संगमेश्वर) येथील 65 वर्षीय पुरूषाचा सीपीआरमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळीची संख्या 1757 झाली आहे. पण जिल्ह्यात कोरोनाने एकाचाही बळी गेलेला नाही. दिवसभरात 51 नवे रूग्ण दिसून आल्याने सक्रीय रूग्णसंख्या 522 झाली आहे. तर 42 जण केरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात सोमवारी रत्नागिरीतील वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या 1 हजार 757 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 855, नगरपालिका क्षेत्रात 349, कोल्हापूर शहरात 390 तर अन्य 163 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 42 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 49 हजार 59 झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 51 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 5, कागल 1, करवीर 1, पन्हाळा 1, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 4, नगरपालिका क्षेत्रात 11, कोल्हापूर शहरात 27 तर अन्य एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात रविवारी 1164 जणांची तपासणी केली. त्यातील 105 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. कोरोना रूग्णसंख्या 522 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून आलेल्या 263 अहवालापैकी 213 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 54 अहवाल आले. त्यातील 52 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 182 रिपोर्ट आले. त्यातील 151 निगेटिव्ह आहेत. जिह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 51 हजार 338 आहेत. त्यापैकी 49 हजार 59 कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 522 रुग्ण उपचार घेत आहेत. शहर आणि परिसरात 250 तर ग्रामीण भागात 87 जणांना होम कोरोंटाईन केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माळी यांनी दिली.
कोरोना रूग्ण 51: एकूण : 51338
कोरोनामुक्त 42 : एकूण : 49059
कोरोना मृत्यू : 1 : एकूण मृत्यू : 1757
सक्रीय रूग्ण : 522