दिवसभरात तीन मृत्यू, 52 कोरोनामुक्त, 35 नवे रूग्ण
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 52 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्तांची संख्या 46 हजार 14 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला तर 35 नवे रूग्ण दिसून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला. सीपीआर हॉस्पिटलमध्ये कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथील 72 वर्षीय महिला आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पुंडाळे येथील 75 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. खासगी हॉस्पिटलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील साळशी येथील 59 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोनाने 1 हजार 654 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 816, नगरपालिका क्षेत्रात 338, कोल्हापूर शहरात 360 तर अन्य जिल्ह्यांतील 140 जणांचा समावेश आहे.
दिवसभरात 520 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 46 हजार 14 झाली. तसेच 35 नवे रूग्ण दिसून आल्याने पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 48 हजार 408 झाली आहे. सध्या 740 रूग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 296 जणांची तपासणी केली. शेंडा पार्क येथील लॅबमधून शुक्रवारी 465 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 420 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 57 रिपोर्ट आले. त्यापैकी 56 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 3, चंदगड 0, गडहिंग्लज 1, गगनबावडा 1, हातकणंगले 0, कागल 1, करवीर 3, पन्हाळा 0, राधानगरी 1, शाहूवाडी 1, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 3, कोल्हापूर शहर 12, अन्य 3 असे 35 रूग्ण असल्याची माहिती डॉ. अनील माळी यांनी दिली.
पॉझिटिव्ह रूग्ण 35, कोरोनामुक्त 52, कोरोना मृत्यू 3
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 48 हजार 408
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 46 हजार 014
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 740
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1 हजार 654
गेल्या 24 तासांत 296 संशयित रूग्ण तपासणी