प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात बुधवारी गेल्या 24 तासांत 2 हजार 274 इतके नवे रूग्ण आढळले. कोरोनाच्या पहिल्या अन् दुसऱया लाटेतील ही एका दिवसातील उच्चांकी संख्या आहे. दुसऱया लाटेत प्रथमच एकाच दिवसांत पॉझिटिव्ह रूग्णसंख्या दुफ्पट आल्याने कोल्हापूरकरांसाठी हे धक्कादायक आहे. दिवसभरात 58 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये जिल्हय़ातील 54 जण आहेत. सक्रीय रूग्णांत 1 हजाराने वाढ झाल्याने कोल्हापूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
जिल्हय़ात बुधवारी कोरोनाने 58 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 2 हजार 840 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 1 हजार 412, नगर पालिका क्षेत्रात 466, शहरात 613 तर अन्य 349 आहेत. मृतांत जिल्हय़ातील 50 जण आहेत. सक्रीय रूग्णसंख्या 12 हजार 816 झाली आहे. दिवसभरात 758 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 67 हजार 107 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिले.
जिल्हय़ात गेल्या 24 तासांत 2 हजार 274 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 51, भुदरगड 41, चंदगड 120, गडहिंग्लज 158, गगनबावडा 8, हातकणंगले 213, कागल 161, करवीर 252, पन्हाळा 129, राधानगरी 28, शाहूवाडी 98, शिरोळ 200, नगरपालिका क्षेत्रात 181 कोल्हापुरात 428 तर अन्य 206 जणांचा समावेश आहे. कोरोनाची एकूण रूग्णसंख्या 82 हजार 763 झाली आहे. आजपर्यतची ही जिल्हय़ातील उच्चांकी रूग्णसंख्या आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी नव्या रूग्णांत दुपटीने झालेली वाढ धोक्याचा इशारा देत आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून बुधवारी 4 हजार 593 अहवाल आले. त्यापैकी 3 हजार 253 निगेटिव्ह आहेत. अॅन्टीजेन टेस्टचे 2 हजार अहवाल आले. त्यातील 1 हजार 469 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 1 हजार 149 रिपोर्ट आले. त्यातील 602 निगेटिव्ह असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
कोरोना रूग्ण 1494 : एकूण : 80489
कोरोनामुक्त 1072 : एकूण : 66349
कोरोना मृत्यू 51 : एकूण मृत्यू : 2782
सक्रीय रूग्ण : 11358