प्रतिनिधी/ कोल्हापूर
जिल्हय़ात मंगळवारी रात्री 11 वाजेपर्यत नव्याने 129 पॉझिटिव्ह रूग्ण आल्याने रूग्णसंख्या 5 हजार 204 इतकी झाली आहे. दिवसभरात 534 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आजपर्यतची ही उच्चांकी रूग्णसंख्या आहे. रात्री दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तसेच 157 जण दिवसभरात कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्हय़ात सकाळी 10 वाजेपर्यत 4 हजार 829 पॉझिटिव्ह रूग्ण होते. रात्री 8 वाजेपर्यत 405 पॉझिटिव्ह रूग्ण आले. त्यामुळे ही संख्या 5 हजार 75 वर पोहोचली. रात्री 11 वाजेपर्यत 129 रूग्ण पॉझिटिव्ह आल्याने ही संख्या 5 हजार 204 इतकी झाली आहे. जिल्हय़ात रात्री आणखी दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळीची संख्या 143 झाली आहे.
पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 534
एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 5 हजार 290
कोरोनामुक्त – 157
एकूण कोरोनामुक्त संख्या – 2092
दिवसभरातील बळी – 13
एकूण बळी -144
ऍक्टिव्ह रूग्णसंख्या – 3290