प्रतिनिधी / कोल्हापूर
जिह्यामध्ये कोरोनाचा उद्रेक सुरुच असून रुग्णांच्या संख्येत तासागणीक भर पडत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारी दुपार पर्यंत जिह्यात नव्या 60 रुग्णांची भर पडल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 1920 वर पोहोचला आहे.
चंदगड, गडहिंग्लज येथील 38 रुग्णांची भर पडली आहे. कोल्हापूर शहरात 8 रुग्णांची भर पडली असून करवीर 9, पन्हाळा 10, राधानगरीमध्ये 7 रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान कबनूर (ता. हातकणंगले) येथील 72 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील खरी कॉर्नर, खंडोबा तालीम परिसर सील करण्यात आला आहे.