तुळजा भवानी मंदिरात रात्री अंबाबाई-तुळजा भवानी-गुरु महाराज यांच्या भेटीचा सोहळा, अंबाबाई चांदीच्या वहानातून भेटीसाठी बाहेर पडणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेला (बुधवारी 13 रोजी) करवीर निवासिनी अंबाबाईसह सर्वच देवदेवतांचा जागर होणार आहेत. यानिमित्ताने रात्री साडे 9 वाजता अंबाबाई चांदीच्या वहानातून नगरप्रदेक्षिणेसाठी मंदिराच्या महाद्वारातून बाहेर पडेल. या नगरप्रदक्षिणेदरम्यान, अंबाबाई, तुळजा भवानी आणि गुरूमहाराज वाडÎातील गुरु महाराज यांच्या भेटीचा सोहळा ही होणार आहे.
दरम्यान, सकाळी 11 वाजता तुळजा भवानी मंदिराच्या वतीने नगरप्रदक्षिणेचे आयोजन केले जाईल. यावेळी चांदीच्या पालखीत तुळजा भवानीच्या पादुका विराजमान करुन प्रत्यक्ष नगरप्रदक्षिणेला प्रारंभ केला. यानंतर तब्बल सात तास सुरु राहणाऱया या नगरप्रदक्षिणा मार्गातील फिरंगाई मंदिर, महाकाली मंदिर, अनुगामिनी मंदिर, उत्तरेश्वर महादेव मंदिर आणि खाटीक चौक परिसरातील गजलक्ष्मी मंदिरांना भेटी देऊन तेथे विविध धार्मिक विधी केले जाणार आहे.
रात्री साडे नऊ वाजता अंबाबाईच्या नगरप्रदक्षिणेचे आयोजन केले जाईल. रात्री 8 च्या सुमारास अंबाबाई मंदिराच्या महाद्वाराजवळ अंबाबाईची उत्सवमुर्ती वहानामध्ये विराजमान करण्यात येईल. यानंतर हे वहान फुलांनी सजवलेल्या वाहनामध्ये विराजमान केले जाईल. परंपरेनुसार तोफेची सलामी दिल्यानंतर वाहन नगरप्रदक्षिणेसाठी प्रस्थान करेल. हे वाहन महाद्वार रोड, गुजरी, भाऊसिंगजी रोड, जुना राजवाडÎाचा नगारखाना मार्गे तुळजा भवानी मंदिरात जाईल. येथे अंबाबाई, तुळजा भवानी व गुरु महाराज यांच्या भेटीचा सोहळा होईल. यानंतर राज घराण्यातील व्यक्तींच्या हस्ते अंबाबाई, तुळजा भवानी आणि गुरु महाराज यांची आरती केली जाईल.
आरती झाल्यानंतर तुळजा भवानी मंदिरातून अंबाबाईचे वहान बाहेर आणून ते वाहनांमध्ये विराजमान करुन नगरप्रदक्षिणेसाठी पुन्हा सुरुवात केली जाईल. हे वाहन भवानी चेंबर, गुरू महाराज वाडा, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वा रोड आदी मार्गावरुन पुन्हा अंबाबाई मंदिराच्या महाद्वाराजवळ नेण्यात येईल. यानंतर वहानातील उत्सवमूर्तीला सोन्याच्या पालखीत विराजमान करुन अंबाबाई मंदिराला प्रदक्षिणासाठी