प्रतिनिधी/शाहुवाडी
शाहुवाडी तालुक्यातील नांदारी येथे ओढ्यालगत बेकायदा सुरू असणारी दारूभट्टी शाहुवाडी पोलिसांनी उध्वस्त केली. याप्रकरणी बबन आनंदा इंगळे (वय-55, रा. नांदारी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, इंगळे याच्या घरात व जेथे ओढ्यावर दारू भट्टी सुरू होती. पोलिसांनी या अड्यावर छापा टाकून गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन अंदाजे 5200 रुपये किंमतीचे ,तसेच पत्र्याचे बॅरेल, प्लास्टिकचे कॅन, रबरी इनर, रबरी पाईप ,काचेचे ग्लास बाटल्या,आधी साहित्य जप्त केले. सध्या कोरोना संसर्ग व बंदी आदेशाचे उल्लंघन व बेकायदा दारू भट्टी लावणे, या आरोपाखाली बबन इंगळे यांच्यावर शाहूवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
या मोहिमेमध्ये निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा पाटील, शिंदे, शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पो.कॉ. एस .जे .काशीद, पो.कॉ सुरेश पोवार, पो.कॉ. भरत मोळके आधी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.