शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यामध्ये पदवीधर व शिक्षक मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. शिरूर तालुक्यामध्ये एकूण 33 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये 26 पदवीधरसाठी सात शिक्षक मतदान केंद्र आहेत तालुक्यात एकूण पदवीधर 10 हजार 816 मतदार आहेत तर शिक्षक साठी 1049 इतके मतदार आहेत सर्वच मतदारांची वैद्यकीय तपासणी करून मतदान केंद्रात प्रवेश देणार असल्याची माहिती तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी दिली.
महा विकास आघाडी व भाजप यांच्यात या विभागात दुरंगी लढत दिसून येते. आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली. तालुक्यामध्ये महा विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील दत्त उद्योगसमूहाचे प्रमुख गणपतराव पाटील तर भाजपच्या वतीने खासदार सुशांत विखे पाटील पृथ्वीराज यादव यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते नेते परिश्रम घेतले.