कुंभोज / वार्ताहर
बाहुबली येथील एम. जी. शहा विद्यामंदिर, ज्युनिअर कॉलेज आजपासून सुरू झाले. आज पहिला दिवस असल्याने फक्त दहावी व बारावीचे वर्ग भरवले. या दोन्ही वर्गाचे २१७ विद्यार्थी उपस्थित होते. आठ महिन्यांपासून बंद असलेली शाळा आजपासून सुरू झाली. शाळेच्या पहिल्याच
दिवशी विद्यार्थ्यांचा उत्साह दिसला.
शाळा व्यवस्थापनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरेशी खबरदारी घेतल्याने पालकांनीही निःश्वास शाळेच्या प्रांगणातच विद्यार्थ्यांची थर्मल स्कॅनिंग करण्यात येऊन वर्गात प्रवेश दिला. शाळा परिसरात सॅनिटायझरची व्यवस्था केली होती.पालकांचे हमीपत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच शाळेत प्रवेश दिला.मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांना संस्थेतरे दिलेल्या सूचना घ्यावयाची खबरदारी व काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शाळा सोमवार, बुधवार, शुक्रवारी दहावीचे वर्ग भरतील.मंगळवार, गुरुवार, शनिवारी नववीचे वर्ग भरतील.बारावीचे वर्ग दररोज भरतील.