हातकणंगले / प्रतिनिधी
हातकणंगले येथील अभिलेख कक्ष (रेकॉर्ड विभाग )येथील महसूल सहाय्यक वर्ग ३ अधिकारी रमेश दगडू राठोड यांना आज दुपारी अडीज हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांना वर्ग दोनची जमीन नसल्याचा दाखला देण्याकरता राठोड यांनी तीन हजार रुपयाची मागणी केली होती तडजोडीनंतर अडीज हजार रुपये ठरले ती रकम स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडले या कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश मोरे, सहाय्यक पोलीस निरिक्षक संजीव बम्बर्गेकर , पोलीस नाईक सुनील घोसाळकर , पोलीस नाईक नवनाथ कदम ,पोलीस नाईक कृष्णात पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली