प्रतिनिधी / कोल्हापूर
गेले कांही दिवसापासून खंडीत झालेली कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा मंगळवारपासून सुरू होणार होती. पण कांही तांत्रिक कारणामुळे विमान सेवा सुरू न झाल्याने, ही सेवा ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. मंगळवारी कोल्हापूर-मुंबई हे विमान कोल्हापूरात येणार होते. पण या विमानाच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाश्यामधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
ऑक्टोबरच्या पहील्या आठवडयातील बुधवारी ही विमानसेवा सुरू होण्याचे संकेत आहेत. ऑनलाईनवर 6 ऑक्टोबर रोजी ही विमानसेवा सुरू होत असल्याचे दाखवण्यात येत आहे. ट्रू जेटची मंगळवार, बुधवार व गुरूवारी या या तीन दिवशी या मार्गावर ही विमानसेवा सुरू होती. पण कांही तांत्रिक कारणामुळे ही सेवा खंडीत झाली होती. पण मंगळवारपासून कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा सुरू होणार होती.पण तांत्रिक कारणामुळे ही विमानसेवा सुरू होऊ शकली नाही.