आशा मोहिते यांचे निधन : मोहिते कुटुंबावर दुःखाचा डोंगर
प्रतिनिधी / कोल्हापूर
माजी नगरसेवक (कै.) बापुसाहेब मोहिते यांच्या पत्नी श्रीमती आशा बापुसाहेब मोहिते (वय 78, रा. शिवाजी पार्क) यांचे गुरूवारी सकाळी निधन झाले. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर खासगी हॉस्टिपटमध्ये उपचार सुरू होते. 12 सप्टेंबर रोजी मोहिते यांचे पुत्र जयदीप यांचे निधन झाले होते. सहा दिवसांच्या आता मुलापाठोपाठ आईचे निधन झाल्याने मोहिते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
श्रीमती यांच्या पश्चात सून, मुली, नातू आणि नात असा मोठा परिवार आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या त्या सासुबाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर यांच्या त्या मातोश्री आणि माजी महापौर विलासराव सासने यांच्या बहीण होत.