प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी म्युकर मायकोसीसने एकाचा मृत्यू झाला तर 2 नवे रूग्ण दाखल झाले. तसेच 2 म्युकरमुक्त झाल्याची माहिती सीपीआरच्या बाहÎसंपर्क अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी दिली.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये बुधवारी म्युकरचे 2 नवे रूग्ण दाखल झाले तर एकाचा म्युकरने मृत्यू झाला. सध्या 108 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी सीपीआरमधून दोघांना डिसचार्ज देण्यात आला. आजपर्यत म्युकरने 54 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. वेदक यांनी दिली.