सचिव वरुण सरदेसाईंवरील आरोपावरुन युवासैनिक संतप्त
प्रतिनिधी / कोल्हापूर
युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी बिनबुडाचे आरोप केल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी मिरजकर तिकटी येथे निदर्शने केली. संतप्त शिवसैनिकांनी आमदार राणे यांच्या प्रतिमेस जोडे निषेध व्यक्त केला. यावेळी वरुण सरदेसाई यांचा अपमान करणाऱया आमदार नितेश राणेंचा धिक्कार असो, अशा घोषणाबाजी करण्यात आल्या.
स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणी सचिन वाझे यांच्यासोबत युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांची चौकशीही राष्ट्रीय तपास यंत्रणेने करावी. वाझे यांनी आयपीएलमध्ये बेटींग करणाऱया टोळ्यांकडुन खंडणी मागीतली होती. यामध्ये सरदेसाई यांनी हिस्सा मागितल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला होता. त्यांच्या या आरोपावरुन शिवसैनिक आक्रमक झाले. नितेश राणे यांचा निषेध करण्यात आला. कोल्हापुरमध्येही युवासैनिकांनी राणे यांचा निषेध केला. यावेळी जिल्हाप्रमुख मंजित माने यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.