प्रतिनिधी / आजरा
वर्ग दोनची जमीन वर्ग एक करून देण्यासाठी ७५ हजारांची लाच घेताना संजय श्रीपती इळके (वय 52) उप लेखापाल तथा प्रभारी नायब तहसीलदार व तलाठी राहुल पंडीतराव बंडगर (वय33) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. याबाबतची
तक्रार शिवसेना तालुका प्रमुख युवराज पोवार यांनी केली होती.
या कामासाठी १ लाख ५० हजारांची मागणी संबंधितांनी केली होती. अखेर ७५ हजार रुपयावर तडजोड करण्यात आली. सोमवारी हि रक्कम स्विकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली. आदिनाथ बुधवंत, पोलीस उप-अधीक्षक, सतिश मोरे पोलीस निरीक्षक, सहा फो संजीव बंबरगेकर, पो.हे.कॉ अजय चव्हाण, पो.ना. सुनिल घोसाळकर, पो.कॉ. रूपेश माने यांच्या पथकाने ही कारवाई केली .