आर्थिक वर्षांत 11 हृदय तर 165 इतर शस्त्रक्रिया, 2019-20 ला 74 हृदय, 1671 अन्य शस्त्रक्रिया, कोरोना काळात शाळा बंद, तपासण्या रखडल्या, `आरबीएसके’ टीम कोरोना तपासणीत सक्रीय, दोन महिन्यांत 25 हृदय, 165 अन्य शस्त्रक्रिया, चार विद्यार्थ्यांच्या कानावर कॉहिलर इंप्लाँट सर्जरी
कोल्हापूर / कृष्णात पुरेकर
गतवर्षी कोरोनामुळे शाळा, अंगणवाड्या बंद राहिल्या. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासण्या थांबल्या. विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रियांना कोरोनाचा फटका बसला. कोरोनापुर्वीच्या आर्थिक वर्षांत 74 विद्यार्थ्यांवर हृदय तर 1671 विद्यार्थ्यांवर अन्य शस्त्रक्रिया झाल्या. पण या आर्थिक वर्षातील 9 महिने कोरोनात गेले, उर्वरीत तीन महिन्यांत 11 जणांवर हृदय तर 165 विद्यार्थ्यांवर अन्य शस्त्रक्रिया झाल्या. विशेष म्हणजे 4 कर्णबधीर विद्यार्थ्यांवर कोहिलर इंप्लाट शस्त्रक्रिया झाल्या. राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाचे कोरोनानंतरचे हे यश आहे.
जगात 2020 ची सुरूवात कोरोनाच्या धक्क्याने झाली, गतवर्षी फेब्रुवारीत कोरोना रूग्ण सापडला, त्यानंतर आर्थिक वर्ष संपतानाच कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन झाले, विद्यार्थ्यांच्या परीक्षा थांबल्या, सुटी लॉकडाऊनमध्ये गेली, कम्युनिटी स्प्रेडच्या धोक्यात पहिले शालेय सत्र गेले. कोरोना नियंत्रणात आला, शाळा सुरू होण्याची चाहूल लागली. प्रत्यक्षात नव्या आर्थिक वर्षातील 9 महिने संपले, नववर्षांत शाळा सुरू झाल्या, आठवी, नववीनंतर पाचवीपुढील वर्ग सुरू झाले. कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीत शाळा सुरू झाल्या, त्यामुळे शालेय आरोग्य तपासणीला वेग आला आहे.
सीपीआर’मधील राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (आरबीएसके) द्वारे जिल्हÎात शालेय विद्यार्थी तपासणीसाठी 42 पथके आहेत. एका पथकात पुरूष, महिला डॉक्टर, फार्मासिस्ट, परीचारीका असते. अंगणवाडÎांत वर्षांतून दोनदा तर शाळांतून 6 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांची वर्षातून एकदा तपासणी होते. यामध्ये दोष आढळल्यास संबंधितांवर मोफत औषधोपचार, शस्त्रक्रिया केल्या जातात. गतवर्षी कोरोनामुळे शैक्षणिक सत्र वाया गेले, पण कोरोना नियंत्रणात येताच उर्वरीत शैक्षणिक सत्र सुरू झाले. शालेय आरोग्य तपासणीला वेग आला. विद्यार्थ्यांवरील शस्त्रक्रियांची संख्याही वाढली आहे. जिल्ह्यात आरबीएसके’ने 2019-20 आर्थिक वर्षांत 4,362 अंगणवाडÎांतील 99 टक्के, 2 लाख 45 हजार 48 बालकांची तपासणी केली. तसेच 2,864 शाळांतील 4 लाख 16 हजार 668 विद्यार्थ्यांची तपासणी केली. त्यातून आरोग्याच्या तक्रारी आढळून आलेल्या 12 हजार 540 बालकांपैकी 12529 बालकांना सेवा दिली. एकूण 49 हजार 492 बालकांवर तर शाळांतील 67 हजार 114 विद्यार्थ्यांवर उपचार केले. गत आर्थिक वर्षांत 74 पैकी 68 विद्यार्थ्यांवर हृदय शस्त्रक्रिया तर 1671 विद्यार्थ्यांपैकी 1660 विद्यार्थ्यांवर अन्य शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
सध्या 2020-21 आर्थिक वर्षात अखेरची तिमाही आरोग्य तपासणीसाठी मिळाली. अंगणवाडÎा बंद असल्याने आरोग्य तपासणी निरंक राहिली. पण 595 शाळांतील 98,873 विद्यार्थ्यांची, 23 टक्के तपासणी झाली. यातून कोरोनाचा फटका विद्यार्थ्याच्या आरोग्य तपासणीलाही बसला. अंगणवाडÎांतील 3195 बालकांना संदर्भसेवा तर 11,570 बालकांवर उपचार केले आहेत. शाळांमधील 12 पैकी 11 विद्यार्थ्यांवर हृदय शस्त्रक्रिया तर 176 पैकी 165 विद्यार्थ्यांवर अन्य शस्त्रक्रिया झाल्या आहेत. विशेष म्हणजे चार विद्यार्थ्यांवर केहिलर इंप्लाँट सर्जरी झाली आहे.
केहिलर इंप्लाँटद्वारे विद्यार्थ्यांना 20 लाखांची मदत : डॉ. अनील माळी
जिल्हÎातील 4 शालेय विद्यार्थ्यांवर लाईन बाजार येथील सेवा रूग्णालयात कोहिलर इंप्लाँट शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियेला 5 लाखांपर्यत खर्च येतो. पण या मोफत शस्त्रक्रियाद्वारे विद्यार्थ्यांना 20 लाखांची मदत झाली आहे. विशेष म्हणजे जन्मतः कर्णबधीर असलेल्या विद्यार्थ्यांना संवाद साधण्यात मदत झाल्याचे समाधान पालकांसह आपल्याला आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी स्पष्ट केले. फेब्रुवारी अखेर 25 विद्यार्थ्यांवर हृदय शस्त्रक्रिया झाल्याचे त्यांनी सांगितले.
आर्थिक वर्ष हृदय शस्त्रक्रिया अन्य शस्त्रक्रिया
2019-20 68 1660
2020-21 25 165
आठ वर्षांतील सर्वांत कमी शस्त्रक्रिया या आर्थिक वर्षांत
आर्थिक वर्ष हृदय शस्त्रक्रिया अन्य शस्त्रक्रिया
2013-14 192 1046
2014-15 106 1361
2015-16 155 1712
2016-17 117 1532
2017-18 125 1388
2018-19 108 1460
2019-20 68 1660
2020-21 फेब्रु. 25 165