वाकरे/ प्रतिनिधी
सहकार, शैक्षणिक, कृषी क्षेत्रातील बोंद्रे दादांचे कार्य आजही माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी काढले.
फुलेवाडी सहकार समुहाचे संस्थापक आणि माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे -दादा यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त फुलेवाडी येथील महात्मा जोतीराव फुले विकास सेवा संस्थेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन शिवाजीराव माने होते. मंत्री पाटील आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते स्व.श्रीपतराव बोन्द्रे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक राहुल माने,हौसिंग सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब पाटील,विजय बोन्द्रे,बाळासाहेब बोन्द्रे,कृष्णराव इंगवले, सदाशिव पाटील,राजीव माने,नागोजीराव पाटील,जयसिंगराव माने,संभाजीराव माने,शामराव माने,सचिव अनिल बोडके,तसेच विकास,दूध आणि हौसिंग सोसायटीचे संचालक, सभासद व अन्य मान्यवर उपस्थित होते.