वार्ताहर / कुंभोज
हातकणंगले विधानसभेचे माजी आमदार राजीव आवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये पक्षाच्या कठीण काळामध्ये पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष संघटना वाढवण्यासाठी झटणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा मानसन्मान ठेवून सर्वांना विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हातकणंगले तालुक्यामधील प्रत्येक गावात ‘गाव तिथे शाखा’ अभियान थोड्याच दिवसात राबविणार व गोरगरीब उपेक्षित व शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी हुपरी व हातकणंगले या दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय सुरू करणार असल्याचे मत माजी आमदार राजीव आवळे यांनी व्यक्त केले.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डी.बी. पिष्टे, विधानसभा अध्यक्ष संभाजी पवार, सहकार जिल्हाध्यक्ष शिरीष देसाई, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष यासिन मुजावर, नगरसेवक विजय खोत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष संदेश भोसले, कार्याध्यक्ष राम कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
या ठिकाणी फिरोज बागवान, परशराम कीर्तिकर, मोहन चौगुले, धनाजी पाटील, संतोष वडेर, शिवाजी भोसले, शहानवाज मुजावर, संदीप तोरस्कर, अल्ताफ हजरत, सागर सुवासे, महेश चौगुले, अजित मोरे, संदीप आळतेकर, जावेद मुजावर, आकाश नलवडे, अविनाश गुरव, सोहेल खतीब, प्रितम मूधाळे राजवर्धन हुजरे आदी.उपस्थित होते.