हेरले/प्रतिनिधी
हेरले ता. हातकणंगले येथील माळभाग परिसरातील २२ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळॆ गावात एकच खळबळ उडाली आहे. गावातील हा पहिलाच रुग्ण असल्याने गावात भीतीचे तावरण पसरले आहे. ग्रामपंचायतीने हा परिसर सील केला असून ३ दिवस गावबंद ठेवण्यात आले आहे. हा युवक कोल्हापूर व हेरले येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये कामास होता. यामुळे या हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या युवकाच्या घरातील आई वडील व संपर्कातील लोकांचे स्वॅब घेणेचे काम सुरू आहे. गावात दोन दिवसांपूर्वी सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा असा आवाज तरुण भारतने उठवला होता याची गंभीर दखल ग्रामस्तरीय कोरोना कमिटीने घेतली नसल्याने ग्रामस्थांतुन संताप व्यक्त होत आहे.