कुंभोज येथे कोरोनो रुग्ण संख्या 65, चार मयत, 45पेक्षा जास्त लोकांना डिस्चार्च
वार्ताहर / कुंभोज
हातकणंगले तालुक्यातील कुंभोजमध्ये कोरोनाबाधितांची संख्याआटोक्यात आणण्यासाठी कुंभोज ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. कोरोना रोगापासून कुंभोजला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून आता घर टू घर सर्व्हे करण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र कोरोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाचे लवकर निदान न झाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व आरोग्य सेतू अॅपवरील हॉटस्पॉट सर्वेक्षणासाठी गावनिहाय पथक नियुक्त करून अधिक प्रभावीपणे सर्वेक्षण करण्याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सूचना दिल्याआहेत. त्यानुसार अंगणवाडी सेविका, शिक्षक व आशा स्वंयसेविका यांनी सर्वेक्षणाला कुंभोजमध्ये सुरुवात केली आहे.
प्रत्येक पथकाने प्रत्येक दिवशी ५० कुटुंब याप्रमाणे सर्वेक्षणाचे कामकाज सुरू झाले आहे. सदर सव्व्हे चार दिवसांत पूर्ण करून अहवाल सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, कुंभोज गावामध्ये कोरोना रुग्णसंख्या ६५ हून अधिक झाली असून चार लोकांचा बळी गेलाआहे. त्यामुळे कुंभोज परिसरातील सर्व शाळांचे सुमारे १६ शिक्षक,१६ अंगणवाडी सेविका व १४ आशा स्वयंसेविका असे सुमारे ४६ जणांच्या माध्यमातून कुंभोजमध्ये सर्व नागरिकांचा आरोग्य सर्वेक्षणाचे नियोजन केले आहे.