सोमवारपासून होणार अंमलबजावणी; निर्बंधात बदल असल्यास परवानगी आवश्यक मुंबई
प्रतिनिधी / मुंबई
पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजनच्या निकषांप्रमाणे सोमवार (14 जून) पासून राज्यांतील जिह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर ठरवील, असे मदत व पुनर्वसन विभागाने नव्या आदेशान्वये जाहीर केले. बंधनाच्या स्तरात बदल नसल्यास परवानगीची आवश्यकता नाही. मात्र बदल असल्यास परवानगी घेणे आवश्यक आहे, असेही मदत व पुनर्वसन विभागाने म्हटले आहे.
सध्या राज्यात 20 हजार 697 ऑक्सिजन बेड्सवर रुग्ण असून ही संख्या 35 हजारापेक्षा कमी असल्याने राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणा पुढील आठवडÎात कार्यरत राहणार नसल्याचे विभगाने बोलताना ,महाराष्ट्र सरकारने 4 जून रोजी जारी केलेल्या आदेशाद्वारे राज्याच्या विविध जिह्यांतील भिन्न प्रशासकीय क्षेत्रांमध्ये संबंधित क्षेत्रातील कोव्हिड 19 पॉझिटीव्हिटीचा वेग आणि वापरात असलेल्या ऑक्सिजन सुविधायुक्त खाटा यांच्या आधारे लागू करण्यात येणार्या बंधनांच्या स्तरांविषयी निर्देश दिले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 10 जून 2021 रोजी आढावा घेण्यात आला. या आकडेवारीच्या आधारे एखाद्या जिह्यात एकापेक्षा अधिक प्रशासकीय क्षेत्रे असल्यास त्यांनी या आकडेवारीचे प्रमाणबद्ध विभाजन करून एकएका क्षेत्राचा निर्देशांक निश्चित करावा आणि त्यानुसार निर्णय घ्यावा. पायाभूत स्तरात बदल न झाल्यास आणि सध्या लागू असलेल्या आदेशानुसार बंधनांमध्ये कोणताही बदल नसल्यास अशाप्रकारच्या बदलांसाठी नव्याने परवानगी घेण्याची आवश्यकता नसेल. बंधनाच्या स्तरात बदल झाला असल्यास आणि नव्या बंधनानुसार बदल प्रस्तावित केले असल्यास अशी पूर्वपरवानगी आवश्यक राहील. बंधनांचा कोणताही स्तर कोणत्याही बदलाविना लागू करावयाचा असल्यास संमतीची आवश्यकता नसेल, असेही यात म्हटले आहे.
स्थानिक प्रशासनाने या आदेशाद्वारे प्रत्येक क्षेत्रासाठी घोषित करण्यात आलेल्या स्तरांची अंमलबजावणी सोमवार, 14 जून 2021 पासून करण्यात यावी, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.