जिल्हाधिकाऱयांची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
कोविडचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी अधिकाऱयांची भूमिका महत्त्वाची आहे. कोविड काळात कामामध्ये बेजबाबदारपणा किंवा हयगय केली तर संबंधित अधिकाऱयांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा डॉ. के. हरिषकुमार यांनी दिला आहे.
जिह्यामध्ये दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. ही साखळी तोडण्यासाठी जनतेसाठी कठोर नियमांची मार्गसूची जारी करण्यात आली आहे. मार्गसूची तोडतील त्यांच्यावर कारवाई करणे, कोविडबाबत जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. तेव्हा अधिकाऱयांनी बेजबाबदारपणे वागू नये. कामाबाबत बेजबाबदारपणा दाखविला तर थेट कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्राम पंचायत हद्दीमध्ये प्रत्येकाने कोविडबाबत काम करणे महत्त्वाचे आहे. कोविड प्रतिबंधक लस देणे, कोविडपासून संरक्षणाबाबत जनजागृती करणे, विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱया व्यक्तींवर कारवाई करणे यासह इतर कामे या काळात करणे गरजेचे आहे. तेव्हा त्या दृष्टीने अधिकाऱयांनी काळजीने काम करणे महत्त्वाचे आहे. पण काही जण बेजबाबदारपणा दाखवत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले.