मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांची सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये प्रादुर्भाव अधिक वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात होमआयसोलेशन ऐवजी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करण्यावर भर द्या, अशी सूचना मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी केली आहे.
कोविड परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी बेळगावसह पाच जिल्हय़ातील आमदार, विधानपरिषद सदस्य आणि खासदार यांच्याबरोबर शनिवारी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही सूचना केली.
कोरोनाबाधित रुग्णांची चिकित्सा आणि त्यांना औषधे देणे महत्त्वाचे आहे. अलिकडे ग्रामीण भागात संसर्ग वाढला असल्याने त्याकडे लक्ष ठेवा, ग्रामीण भागात जागृती करा, अशी सूचना त्यांनी केली. आशा कार्यकर्त्यांना आता वेतन देण्यात आले आहे. हजार डॉक्टरांच्या नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच ते सेवेत दाखल होतील, असे ते म्हणाले.
लवकरात लवकर डॉक्टरांची भरती करा
या बैठकीत उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगावमधून मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी बोलताना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, डॉक्टरांनो ग्रामीण भागात चला, अशी घोषणा सरकारने केली आहे. परंतु डॉक्टरांची संख्या कमी आहे. त्यामुळे लवकरात लवकर डॉक्टरांची भरती करावी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. त्यांचे वेतन देण्याची मागणीही त्यांनी केली. बेळगाव हा मोठा जिल्हा असल्याने लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, असेही त्या म्हणाल्या. यावर मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी आशा कार्यकर्त्यांचे वेतन लवकरच त्यांना मिळेल, असे सांगितले.
बिम्स्मध्ये 800 बेडस् आहेत. परंतु ऑक्सिजन व्यवस्था पुरेसी नसल्याने 300 बेड फक्त रुग्णांसाठी उपलब्ध आहेत, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. डॉक्टरांची कमतरता असल्याने वैद्यकीय कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कोरोना उपचारासाठी सामावून घेण्याची सूचना राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केली.
कर्मचाऱयांच्या नेमणूका त्वरित कराव्यात
रुग्णांना पुरेसा औषध पुरवठा होईल, कर्मचाऱयांच्या नेमणूका त्वरित कराव्यात, आयुष्मान भारत योजनेंतर्गत उपचार होतील यावर भर द्यावा, अशी सूचना बैलहोंगलचे आमदार महांतेश मानवी यांनी केली. कित्तूर तालुक्मयात 100 बेडस्चे हॉस्पिटल सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. आशा व अंगणवाडी कर्मचाऱयांना कोरोना योद्धा म्हणून पहावे, अशी सूचना आमदार महांतेश कौजलगी यांनी केली. रुग्णांच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या कमी असल्याने त्वरित डॉक्टरांची भरती करावी, अशी मागणी रामदुर्गचे आमदार महादेवाप्पा यादवाड यांनी केली.
छायाचित्र, पत्रकारांना आर्थिक सहाय्य करा
कुडचीला विशेष बाब म्हणून ऑक्सिजन प्लान्ट मंजूर करण्याची मागणी आमदार पी. राजीव यांनी केली. व्हेंटीलेटर्स पुरेसे असले तरी डॉक्टर नसल्याने समस्या उद्भवते याकडे रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी लक्ष वेधले. बिम्स हॉस्पिटलच्या आवारात सुरू करण्यात येणाऱया ऑक्सिजन प्लॉन्टचे काम लवकर पूर्ण करावे व ऑक्सिजनचा पुरवठाही लवकर करावा, अशी मागणी आमदार अनिल बेनके यांनी केली. छायाचित्रकार, पत्रकार यांनाही कोरोना योद्धा समजून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी केली.
या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, विधानसभेचे उपसभापती आनंद मामनी, विधानपरिषद सदस्य साबण्णा तळवार, बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ, जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. बाळकृष्ण तुक्कार आदी उपस्थित होते.