जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांचे आवाहन
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनामुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक मृत्यु पावले आहेत. व बालकांची काळजी घ्यायला कोणीही नाही. ज्यांचे दोन्ही पालक कोरोनामुळे दवाखान्यात भरती आहेत. व बालकांना तात्पुरता आश्रय हवा आहे. कोरोनामुळे बालकांच्या संरक्षणाबाबत कुठलीही समस्या असेल तर चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केले आहे.
ढवळे म्हणाल्या, अशा मुलांची नाव व फोटो सार्वजानिक करणे कायद्याने गुन्हा आहे. अशा मुलांची माहिती फक्त दिलेल्या नंबर वरती द्यावी. मुलांची व्यवस्था द्रोणागिरी शिक्षण संस्था संच, शिशुगृह म्हसवड ता. माण जि. सातारा येथे करण्यात आली आहे. तेथील संपर्क क्रमांक 9766133968 आहे. जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघ, संच मुलां-मुलींचे निरीक्षणगृह/बालगृह सातारा येथे करण्यात आली आहे. तेथील संपर्क क्रमांक 8793835345 आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय संपर्क क्रमांक 02162-237353, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी 9921380135, बाल कल्याण समिती 9890837284 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करत आहे.