प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम संतगतीने सुरू आहे. कोविशिल्ड लसीचे डोस उपलब्ध होते. मात्र कोव्हॅक्सिन चे डोस उपलब्ध नसल्याने नागरिकांची चिंता वाढली होती. रविवारी जिह्यात कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. यामुळे सोमवारी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचा कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस सुरू झाला.
जिह्यात 16 जानेवारीपासून एका दिवसात 30 हजार नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. दरम्यान, जिह्यात सुमारे 7 लाख 50 हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले असून 37 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. जिह्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे 1 मे रोजी लसीकरणास सुरूवात झाली. लसीची कमी प्रमाणात उपलब्धता व पहिला डोस घेणाऱयांच्या वाढत्या संख्येमुळे 10 मे रोजी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण पूर्णतः बंद करण्यात आले होते. कोव्हॅक्सिन घेतलेल्या नागरिकांची पहिल्या डोसची मुदत संपत आल्याने दुसरा डोस सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस जिह्यात केवळ 192 नागरिकांनी घेतला आहे. सध्या लस उपलब्ध झाल्याने नागरिक कोव्हॅक्सिन चा दुसरा डोस घेण्यासाठी घराबाहेर पडले आहेत.
दहा लाख नागरिक पहिला डोस प्रतीक्षेत जिह्यात 18 ते 44 वयोगटातील केवळ 16 हजार 522 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. या वयोगटातील नागरिकांची लोकसंख्या सुमारे 11 लाख आहे. त्यामुळे 10 लाख 83 हजारांहून अधिक नागरिक अजूनही लसीकरणाच्या प्रतीक्षेत असून या वयोगटातील नागरिकांना पहिला डोस लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस केवळ जिल्हा रूग्णालय, कराड, पाटण, फलटण, कोरेगाव, दहिवडी, मेढा, वाई, महाबळेश्वर या उपजिल्हा रूग्णालयात तर खटाव, शिरवळ या प्राथमिक आरोग्य केंद्रांत सूरू राहणार आहेत.