- ‘बालिके भविष्यत’ उपक्रमांतर्गत मुलींमधील आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न
ऑनलाईन टीम / अनंतपूर :
आंतरराष्ट्रीय मुलगी दिनानिमित्त आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात अनेक शाळकरी मुलींनी अधिकारी आणि कर्मचारी म्हणून कामकाज पाहिले.
मिळालेल्या माहितीनुसार, अनंतूपरचे जिल्हाधिकारी गंधम चंद्रुडू यांनी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. ‘बालिके भविष्यत’ या उपक्रमांतर्गत मुलींमधील आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
‘बालिके भविष्यत’ या उपक्रमांतर्गत शेतकरी कुंटुंबातील 16 वर्षीय श्रावणी हिने अनंतपूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. श्रावणीचे वडील शेतकरी आहेत तर आई रोजंदारीवर कामाला जाते. श्रावणी सध्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे.
श्रावणीने दिवसभराच्या कामकाजात दोन फाईल्सवर स्वाक्षरी केली. अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एका पीडितेला 25 हजारांचे अनुदान तिने मंजूर केले. शासकीय महिला कर्मचाऱ्यांना रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाबद्दल फोन करु नयेत, हा निर्णय श्रावणीने घेतला.
शालेय विद्यार्थिंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपक्रात सहभाग घेत गावातील शासकीय कर्मचारी ते महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी पदाचे कामकाज पाहिले. अनंतपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कौतुक केले आहे.