क्रिती सॅनोनने आपल्या आगामी ‘मिमी’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. लक्ष्मण उतेकरने या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. मराठीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘मला आई व्हायचंय’ याचा हा रिमेक आहे. समृद्धी पोरेंनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. ‘सरोगसी’वर हा चित्रपट बेतलेला आहे. ‘मिमी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तिने आपला अनुभव शेअर केला. ती म्हणाली की, आजवर मी अनेक चित्रपट केले. पण या चित्रपटाचे शूटिंग करताना अधिक समाधान मिळाले. याचे मुख्य कारण म्हणजे चित्रपटातील सहकलाकार आणि तंत्रज्ञ. हा चित्रपट माझ्या खूप जवळचा असणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकरचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
Previous Articleकतरिनाच्या चित्रपटाची संजय लीला भन्साळी करणार निर्मिती
Next Article गाजर ज्यूस