नवी दिल्ली
लघु स्वरूपाचे कर्जपुरवठा उपलब्ध करून देणाऱया अनेक कंपन्यांपैकी क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण यांच्याकडून ग्रामीण भागासाठी कर्ज वितरण करण्यात येते. यामध्ये नोव्हेंबर महिन्यात जवळपास 60,000 नवीन कर्जदार कंपनीने जोडले आहेत. मागील महिन्याच्या दरम्यान कंपनीने 1,505 कोटी रुपयांचे कर्ज वितरणासोबत कोरोना विषाणूच्या अगोदरची स्थिती प्राप्त केली. क्रेडिट ऍक्सेसकडून ग्रामीण ग्राहकांमधील विश्वास संपादन केला असून याच मदतीने कंपनीने मजबूत व्यवसाय वृद्धींगत केला आहे. कंपनीने ऑक्टोबर 2021 च्या दरम्यान 1,371 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले होते. यासोबतच नोव्हेंबरमध्ये 59,930 नवीन तर ऑक्टोबर महिन्यात 55,581 जणांना कर्ज वितरण केले आहे.