सांगली / प्रतिनिधी
येथील क्लासेस् फॉर कॉमर्स करियर तर्फे मोफत ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे 11 ऑक्टोंबर रोजी आयोजन केले जाणार असून या स्पर्धेस सांगलीमधील पुरोहित चेस अकॅडमीचे सहकार्य प्राप्त होणार आहे अशी माहिती बुद्धिबळ प्रशिक्षक श्रेयस विवेक पुरोहित यांनी दिली.
ही स्पर्धा दिनांक ११ रोजी अरेना पद्धतीने होणार असून पहिल्या फेरीस सायंकाळी ७ वाजता सुरुवात होईल. २००० पेक्षा कमी मानांकन असणारे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.
क्लासेस् फॉर कॉमर्स करियरचे चिंतामणी गोडबोले यांच्या मार्फत ही स्पर्धा पुरस्कृत केली गेली असून तांत्रिक पंच म्हणून पुरोहित चेस अकॅडमीचे प्रशिक्षक श्रेयस विवेक पुरोहित, फिडे पंच दीपक वायचळ आणि शार्दूल तपासे काम पाहणार आहेत.