प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ तालुक्यात अति पाण्याचा वापर प्रमाणापेक्षा जास्त रासायनिक खते व नैसर्गिक पाण्याचा स्रोत बंद केल्यामुळे अनेक जमिनी क्षारपड बनलेल्या आहेत या जमिनी सुधारण्यासाठी गणपतराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. आधुनिक पद्धतीचा वापर करून क्षारपड जमीन मुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. तो कौतुकास्पद असून हा पॅटर्न राज्यभर राबविण्यासाठी आपण खास प्रयत्न करू अशी ग्वाही राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी शिरोळ तालुक्यातील शेडशाळ, घालवाड, अर्जुनवाड कवठेसार यांसह अन्य भागातील क्षारपड जमीन पाहणी केली या प्रसंगी त्यांची भेट घेतली असता ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाच्यावतीने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ही योजना राबवण्यात आली होती. क्षारपड जमीन काही भागात मोठ्या प्रमाणात झाली आहे. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी या तालुक्यातील क्षारपड क्षारपड जमीन मुक्तीचा कार्यक्रम हाती घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
क्षारपड जमीन धारक शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने अर्थसाह्य करण्यासाठी आपण खास प्रयत्न करू चालू वर्षा अतिवृष्टीने राज्यांमध्ये 41 लाख हेक्टर जमीनीमधील पिके गेली आहेत तर कांहीं भागातील पंचनामे सुरू असल्याचे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत गणपतराव पाटील यांनी करून तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारण्यासाठी खास प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले कारखान्याच्या कार्यस्थळावर प्रोजेक्ट्टदारे माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी विभागीय कृषी सहसंचालक दशरथ ताबाळे जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे प्रकल्प संचालक आत्मा सुनंदा कुराडे कृषी उपसंचालक कोल्हापूरच्या भाग्यश्री पवार कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले कृषी सहाय्यक सुजाता तावरे ए पी राजमाने रमेश माळगे कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील शेती अधिकारी अधिकारी दिलीप जाधव कारखान्याचे संचालक विजय सूर्यवंशी नंदकुमार पाटील डॉक्टर विलास पाटील सुरेश चौगुले गजानन करे नियम असो पाटील भैया रावसाहेब चौगुले चिकू गुरव अशोक शिंदे संजय सुतार दादा काळे यांच्यासह शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.