मार्केट पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
खंजर गल्ली येथे गांजा विकणाऱया दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. मार्केट पोलिसांनी सोमवारी ही कारवाई केली असून त्यांच्या जवळून 620 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
सलीम खमरुद्दीन सौदागर (वय 46, रा. बागवान गल्ली), इनायत शब्बीर धारवाडकर (वय 21, रा. काकर गल्ली) अश त्यांची नावे आहेत. मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगमेशव शिवयोगी, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर, एस. बी. खानापुरे, एल. एस. कडोलकर, एन. वाय. मैलाके, आशीर जमादार, मारुती चावडी, व्ही. बी. माळगी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
खंजर गल्ली येथे गांजा विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळताच अचानक छापा टाकून सलीम व इनायतला ताब्यात घेण्यात आले. त्यांची झाडती घेतली असता त्यांच्या जवळ 620 ग्रॅम गांजा आढळून आला. या दोघा जणांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरुन त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.