पाच जणांना अटक : मार्केट पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
खंजर गल्ली येथे मटका अड्डय़ावर छापा टाकून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री मार्केटचे पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
परशुराम सिद्राई बुरुड, रा. निलजी, तातू राजू मांग, मूळचा रा. नदी इंगळगाव सध्या रा. खडक गल्ली, राजू बळीराम पाटील, रा. चव्हाट गल्ली, रमेश लक्ष्मण आलोजी, रा. अगसगा, मुदस्सर मेहबूब बेपारी, रा. खंजर गल्ली अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.
या सर्व पाच जणांवर कर्नाटक पोलीस कायदा 78 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याजवळून 7 हजार 313 रुपये रोख रक्कम, 30 चिठ्ठय़ा, बॉलपेन जप्त करण्यात आले आहे. वारंवार छापे टाकूनही खंजर गल्लीसह शहरातील अनेक परिसरात मटका जोरात सुरू आहे.