गावचा वीज प्रश्न चतुर्थीपूर्वी सोडवा
ओटवणे / प्रतिनिधी-
ओटवणे गावात गेल्या पंधरा दिवसापासून होत असलेल्या खंडित वीज पुरवठ्याबाबत संतप्त ग्रामस्थांनी सावंतवाडी विज कार्यालयाला धडक देऊन उपअभियंता एस एस भूरे यांना जाब विचारला. सातत्याने होत असलेल्या खंडित वीज पुरवठाबाबत श्री भुरे यांना धारेवर धरीत त्यांच्यासमोर समस्यांचा अक्षरश: पाढाच वाचला.
यावेळी श्री भुरे यांनी इन्सुली वीज उपकेंद्राच्या विलवडे येथून थेट ओटवणे गावाला सुरळीत वीजपुरवठा करण्याची ग्वाही दिली. तसेच माजगाव विज उपकेंद्रातून नवीन वीज वाहिनी टाकण्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांचे समाधान झाले.
यावेळी माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर, संतोष भैरवकर, सगुण गावकर, संतोष तावडे, स्वप्निल उपरकर, दीपक गावकर, प्रमोद केळुसकर, आनंद गावकर, हनुमंत तावडे, अनंत तावडे, स्वप्निल म्हापसेकर, संतोष सावंत, श्रीधर गावकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.