सातारा, खटाव, कोरेगावात रूग्ण वाढ कायम
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ात कोरोनाच्या आकडेवारीतील चढउतार कायम असून शहरी भागात सातारा वगळता अन्यत्र कोरोनाचा वेग मंदावला आहे. ग्रामीण भागात कमीअधिक प्रमाणात रूग्ण सापडण्याचे प्रमाण कायम आहे. 1 जानेवारीपासून सातारा, खटाव, कोरेगाव या तालुक्यात रूग्ण वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी रात्रीच्या अहवालात …. पॉझिटिव्ह आले असून 30 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. खटाव तालुक्यात रूग्णवाढ होत असताना गेल्या चोवीस तासात दोघांचा मृत्यू झाला आहे.
जानेवारीपासून खटावमध्ये वाढले 66 तर कोरेगावात 61 रूग्ण
जिल्हय़ात सातारा शहर व तालुक्यात होणारी वाढ प्रथम क्रमांकावर आहे. कोरोनाची स्थिती नियंत्रणात असून रोज येणारे आकडे शंभराच्या खाली आहेत. मात्र सातारा, खटाव व कोरेगावात रोज रूग्ण सापडण्याचे प्रमाण जास्त आहे. 1 जानेवारीपासून खटावमध्ये 66 तर कोरेगाव तालुक्यात 61 रूग्ण बाधित आले आहेत. ही आकडेवारी पाहता या तालुक्यांमध्ये काळजी गरजेची आहे. साताऱयाच्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात रूग्ण सापडत आहेत. त्या तुलनेत कराड, फलटण व वाईमध्ये वेग मंदावला आहे.
30 नागरिकांना दिला डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 30 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. याबरोबरच कोरोनामुक्तीचा आकडा 54 हजार 165 इतका झाला आहे.
2 कोरोना बाधितांचा मृत्यू
गेल्या चोवीस तासात खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या नांदवळ वडुज (ता. खटाव) येथील 67 वर्षीय पुरुष, येराळवाडी (ता. खटाव) येथील 69 वर्षीय महिला या दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
361 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
गेल्या चोवीस तासात 361 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्हा रुग्णालय सातारा येथील 38, कराड 74, फलटण 4, कोरेगाव 14, वाई 40, खंडाळा 2, रायगाव 21, पानमळेवाडी 55, महाबळेश्वर 25, दहिवडी 51, म्हसवड 4 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 33 असे एकुण 361 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.