हिर्याचे दागिने प्रत्येकीलाच आकर्षित करतात. सणवार किंवा लग्नसमारंभांच्या निमित्ताने छोटासा का होईना पण दागिना घेतला जातो. हिर्याची अंगठी, कानातलं यांना प्राधान्य दिलं जातं. अर्थात हिर्याच्या झळाळीची कितीही भुरळ पडत असली तरी हिर्याचे दागिने खरेदी करणं सोपं नसतं. अस्सल आणि नक्कल याबाबतीत आपली फसवणूक होऊ शकते. हिर्याच्या बाबतीतल्या अनेक बाबी आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे कमी किंमतीचा हिरा जास्त किंमतीला विकला जाऊ शकतो. तुम्हीही हिर्याचे दागिने खरेदी करण्याच्या विचारात असाल तर या टिप्स नक्कीच उपयोगी पडतील.
- हिर्याला पाडण्यात आलेले पैलू आणि डिझाइनवरूनच या रत्नाची किंमत ठरते. त्यामुळे छोटय़ाशा हिर्याची किंमत खूप जास्त असू शकते. म्हणूनच हिरा खरेदी करताना त्याला पाडण्यात आलेले पैलू आणि त्याचं डिझाइन या बाबींकडे विशेष लक्ष द्या.
- हिर्याच्या दर्जाकडे विशेष लक्ष द्यायला हवं. या रत्नाची किंमत त्याच्या दर्जावरून ठरते. म्हणून छोटय़ा आकाराचा हिरा महाग आणि मोठय़ा आकाराचा हिरा तुलनेने स्वस्त असू शकतो. हिर्याचा दर्जा जाणून घेण्यासाठी तुम्ही दुकानातल्या तज्ञ व्यक्तीची मदत घेऊ शकता. हिर्याच्या जाणकार व्यक्तीला सोबत घेऊ न जाऊ शकता. हिर्याच्या आकारापेक्षा त्याच्या दर्जाला जास्त महत्त्व द्यायला हवं. लहान आकाराचा पण चांगल्या दर्जाचा हिरा खरेदी करणं अधिक योग्य ठरतं.
- हिर्याचे दागिने खरेदी करताना सोबत प्रमाणपत्रही घ्या. हिरा अस्सल असेल तर दुकानदार तुम्हाला प्रमाणपत्र देईल. यामुळे हिर्याच्या दागिन्यांची विक्री करताना तुम्हाला अडचण येणार नाही. हिर्याला बाजारात काहीच किंमत मिळत नाही हा समज चुकीचा आहे. प्रमाणपत्र असेल तर तुम्ही हिर्याची योग्य दरात विक्री करू शकता.
- रंगीत हिर्यापेक्षा कोणताही रंग नसलेला हिरा अधिक मौल्यवान असतो. हिरा जेवढा पारदर्शक तेवढीच त्याची किंमतही जास्त हे लक्षात ठेवा. हिर्याचे दागिने खूपच महाग वाटत असतील तर काही दिवस थांबून मग खरेदी करा. क्रेडिट कार्डवर दागिन्यांची खरेदी करू नका. क्रेडिट कार्डावर दागिन्यांची खरेदी करणं महाग पडू शकतं.