प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिकच वाढत चलले आहे. शनिवारी तालुक्यात पुन्हा 14 कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 482 इतकी झाली आहे. तर शनिवारी एका पुरुष व महिलेला श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने उपचारासाठी खानापूरच्या दवाखान्यात आणले होते. त्या दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. यापैकी एक खानापूर दवाखान्यात तर दुसरा बेळगावला नेत असता वाटेतच दगावला. यामुळे आता तालुक्यात कोरोनामुळे दगावलेल्यांची एकूण संख्या 14 झाली आहे.
शनिवारी सापडलेल्या कोरोनाबाधितांमध्ये शहरातील तिघांचा समावेश आहे. यामध्ये समर्थनगर येथे 46 वर्षीय महिला, स्टेशन रोड येथे 19 वर्षीय महिला तसेच विद्यानगर येथील 22 वर्षीय पुरुषाचा कोरोना पॉझिटिव्हमध्ये समावेश आहे. तसेच नंदगडमधील पोलीस क्वॉर्टर्समध्ये 20 वर्षीय महिला तसेच 28 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित झाल्याचे उघडकीस आले आहे. शिवाय संगरगाळी गावात 49 व 21 वर्षीय पुरुषाबरोबरच 3 वर्षीय बालकालाही कोरोना झाला आहे. याशिवाय शिवाजीनगर येथील 47 वर्षीय पुरुष, लोकोळी येथे 83 वर्षीय पुरुष, गोल्याळी येथे 65 वर्षीय पुरुष, कणकुंबी येथे 34 वर्षीय महिला, तसेच असोगा येथे 41 वर्षीय महिला व लोंढा येथे 47 वर्षीय महिलेला कोरोना झाला आहे.
दरम्यान, शनिवारी दगावलेल्या 2 कोरोनाबाधितांमध्ये बलोगा येथील 50 वर्षीय पुरुष तर गर्लगुंजी येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे.