चापगाव, गर्लगुंजीत होळी-धुळवड उत्साहात : खानापूर शहरात शुक्रवारी रंगपंचमी साजरी होणार
वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुक्मयात होलिकोत्सव पारंपरिकरित्या साजरा करण्यात आला. एकीकडे कोरोना महामारी संकटामुळे होळी उत्सव मोठय़ाने साजरा करण्यासाठी शासनाने निर्बंध घातले असताना खानापूर तालुक्मयाच्या ग्रामीण भागात मात्र होळी पौर्णिमा पारंपरिकरित्या साजरी करण्यात आली.
तालुक्मयात जंगलातून लाकूड आणून होळी साजरी करण्याची परंपरा आहे. होळी पौर्णिमेच्या निमित्ताने गावच्या वेशीत असलेल्या चव्हाटा देवस्थानच्या ठिकाणी हा होळी उत्सव साजरा केला जातो. उंचच्या उंच झाड तोडून ते सजवले जाते व एकीने या होळी उभारल्या जातात. या होळीच्या उत्सवासाठी गावातील बालगोपाळ एकत्र येऊन उत्सव साजरा केला जातो. होळी आणि पुरणाची पोळी अशा उक्तीप्रमाणे या होळी पौर्णिमेला रविवारी सायंकाळपासून उत्साहात सुरुवात झाली. अनेक गावांमध्ये रविवारी रात्रीच होळी रोवण्यात आली.
सोमवारी सकाळपासून अनेक गावांमध्ये धुलीवंदन तसेच रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला. खानापूर तालुक्मयाच्या ग्रामीण भागामध्ये बऱयाच ठिकाणी धुलीवंदन दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. चापगावसह अनेक परिसरात सोमवारी सकाळपासून रंगपंचमीमध्ये बाळ गोपाळ सामील झाले. सकाळपासून गावागावात डॉल्बीच्या निनादात रंगपंचमीमध्ये अनेक युवक सामील झाले होते.
गर्लगुंजी येथे पारंपरिकरित्या होळी
गर्लगुंजी (ता. खानापूर ) येथे रविवारी होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. रात्री उशीरा गावातील चव्हाटा गल्लीतील चव्हाटय़ावर होळी उभारण्यात आली. रात्री पंच मंडळी व मानकरी यांच्या उपस्थितीत होळीची पुजा करण्यात आली. त्यानंतर होळी पेटविण्यात आली. यावेळी युवा कार्यकर्त्यांनी मोठय़ा उत्साहाने व आनंदाने होळी पेटवून होळीचा सण साजरा केला.
चापगावात रंगपंचमी साजरी
चापगाव येथे दरवषीप्रमाणे यावषी होलिकोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानुसार चापगाव, अल्लेहोळ, वड्डेबैलसह परिसरातील नागरिकांनी अल्लेहोळ जंगलातून लाकूड आणले व रविवारी रात्रीच होळी उभा करण्यात आली. सोमवारी सकाळपासून गावात रंगपंचमीबरोबर होलिकोत्सव साजरा करण्यात आला. रंगपंचमीमध्ये बाळगोपाळांसह वडीलधारीही सहभागी झाली होती. दुपारी 12 वाजता होळी कामाण्णाचे दहन झाले. चव्हाटा देवस्थानसमोर पुढील पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन व वारकऱयांचे भजन केले जाते. खानापूर तालुक्मयाच्या प्रत्येक गावागावात चव्हाटा देवस्थान आहे. या ठिकाणी होलिकोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. खैरवाड, झुंजवाड, बेकवाड, हेब्बाळ, कारलगा, यडोगा, कुप्पटगिरीसह अनेक गावांमध्ये पारंपरिकरित्या होलिकोत्सव साजरा करण्यात आला.
लक्केबैल येथे होलिकोत्सव
खानापूर तालुक्मयातील लक्केबैल येथे होलिकोत्सव हा वर्षातला मोठा सण म्हणून साजरा केला जातो. सलग पाच दिवस या गावात कडक वार पाळले जातात. गावात कोणीही पायात पादत्राणे घालत नाहीत, पादत्राणे घालून येणाऱयाला दंड आकारणी केली जाते. पाच दिवस दररोज गोड-धोड करून या उत्सवाला मोठे उधाण आणले जाते. गावच्या मध्यभागी असलेल्या चव्हाटा देवस्थानच्या ठिकाणी दरवषी उंच-उंच होळी उभारण्याची परंपरा आहे. नवसाला पावणारा चव्हाटा म्हणून या होलिकोत्सवाला माहेरवाशिनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहतात. या निमित्ताने यावषीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
खानापूर शहरात शुक्रवारी रंगपंचमी-चव्हाटा यात्रा रविवारी
खानापूर : तालुक्याच्या पश्चिम भागातील कणकुंबी, पारवाड, चिगुळे, बेटणे, आमटे, कालमणी तसेच हेम्माडगा, गवाळी, पास्टोळी, कोंगळा, देगाव, मेंडील, तळेवाडी, कृष्णापूर आदी गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या गावांमध्ये पाच दिवसांच्या होलिकोत्सवाला सुरुवात झाली आहे. खानापूर शहरातही होलिकोत्सवाला रविवारी रात्रीपासून प्रारंभ झाला. प्रथेप्रमाणे अर्बन बँक चौक, चव्हाटा देवस्थान निंगापूर गल्ली, लक्ष्मी मंदिर, ग्रामदेवता रवळनाथ मंदिर, केंचापूर गल्ली, हरिजनवाडा, राजश्री शाहूनगर या ठिकाणी प्रथेनुसार होळी उभारण्यात आली. तसेच सायंकाळी ठिकठिकाणी कामाण्णाही पेटविण्यात आला. खानापूरची रंगपंचमी शुक्रवार दि. 2 एप्रिल रोजी सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत साजरी केली जाणार आहे. तसेच रंगपंचमीच्या दुसरे दिवशी प्रथेप्रमाणे निंगापूर गल्लीतील चव्हाटा जत्रा होते. पण यावर्षी रंगपंचमीच्या दुसरे दिवशी शनिवार आल्याने आता चव्हाटा जत्रा रविवार दि. 4 रोजी दुपारी 3 ते रात्री 11 या वेळेपर्यंत साजरी करण्यात येणार आहे.